भडगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कानिराम परदेशी यांना सापडलेला ११ हजार रूपये किंमतीचा मोबाईल पोलीसांच्या मदतीने मुळमालकाच्या स्वाधिन केल्याने प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले आहे. त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक कनिराम बुधा परदेशी यांना विवो वाय ९१ कंपनीचा ११ हजार किंमतीचा मोबाईल सापडला होता. त्यांनी याबाबत मुलगा स्वप्नील परदेशी यासं सांगितले. त्यांनी मोबाईल मालकाचा शोध घेवुन खात्री झाल्यानंतर पोलीस स्टेशन बोलवुन मोबाईल धारक राकेश वाघ यांना परत केला. कनिराम परदेशी यांचे दोन्ही मुले स्वप्नील परदेशी चाळीसगाव व हरिष परदेशी जळगाव दोन्ही पोलीस सेवेत असून चांगली सेवा बजावत आहे. तर पत्नी पुष्पा परदेशी अंगणवाडी सेविका व शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख आहेत.
मला कोणत्याच गोष्टीचा लोभ नसल्याने मी प्रामाणिकपणे मोबाईल परत केल्याने मनस्वी आनंद असल्याचे परदेशी यांनी म्हटले. तर यावेळी राकेश वाघ यांनी परदेशी यांचे आभार मानत खऱ्या माणुसकीचे दर्शन घडल्याचे सांगत आनंद व्यक्त केला . यावेळी पोलीस कर्मचारी ईश्वर पाटील, आदी उपस्थित होते.