भडगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायतींसाठी मतदान

भडगाव  : प्रतिनिधी | तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या १९६ जागा साठी ९९ मतदान केद्रावर शांतता पुर्ण वातावरणात मतदान झाले. काही गावात वादविवादाच्या कीरकोळ घटना सोडल्या तर मतदान शांततेत पार पडले.

तालुक्यात माणकी, पळासखेडा, लोण पिराचे, पाढरंद या ४ ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झाल्या असुन आमडदे, गिरड, पिपरखेड, वडजी, वाडे, महिंदळे या प्रमुख गावातील निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यात ७५.४३ टक्के मतदान झाले आहे.

गिरड येथिल ग्रामपंचायतच्या १५ जागासाठी ३६ उमेदवार रिगणात होते. येथे ५०७६ पैकी ३८९४ मतदारांनी मतदान केले . भट्टगाव येथिल ७ जागा पैकी २ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ५ जागासाठी १२ उमेदवार रिंगणात होते ७६ टक्के मतदान झाले. सावदा येथिल ९ जागा पैकी ८ जागा बिनविरोध १ जागेसाठी ४ उमेदवार रिगणात आहेत ७५.२१ टक्के मतदान झाले. वाडे येथे ४४६३ पेकी ३४१८ मतदारांनी मतदान केले भोरटेक येथे ७९.१९ टक्के मतदान झाले. बांबरुड येथे ८०.६९ टक्के , मळगाव येथे ८७.८८ , तादुळवाडी येथे ७३.०१, वडजी येथे ७४.४२ , पिचर्डे येथे ७६.४६ , बात्सर येथे ८०.६४ , शिवणी येथे ८१.३८ , जुवार्डी६१.८६ , पिप्रीहाट ७४.६५ , खेडगाव ६६.३२ , वाक ८०३६ , महिंदळे ७८.४९ , वलवाडी ८२.०९ वडगाव नालबंदी ७५.४९ , वडगाव ७१.२७ , बाळद९७.१ , कोठली ६९.८८, बोदर्डे ८५.४२ , पिपरखेड७३.६४ , पिपळगाव ७०.९५ , गिरड ७६.५० , वरखेड७७.६७ , बांबरुड प्र.उ. ६०.३८, आमडदे७०.८६ , आंचळगाव ७९.१२ टक्के मतदान झाले .

महिंदळे, वाडे, बोदर्डे,आमडदे येथे बॅलेट युनिट बदल करण्यात आले होते. ग्रामपंचायत निवडणुक कामी १ पोलीस निरीक्षक, १ सहा पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक, ८१ पोलीस कर्मचारी, १ महिला कर्मचारी, ५५ होमगार्ड, १ आरसीपी प्लाटुन, १ एसआरपीएफ प्लाटुन, १ स्ट्रागरुम गार्ड असा पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वाडे येथे तहसिलदार निर्णय अधिकारी तृप्ती धोडमिसे (भा प्र से) यांच्या संकल्पनेतून आदर्श मतदान केंद्रावर मतदारांना उत्तम सुविधा मिळतील याची दक्षता घेण्यात आली. या मतदान केंद्रांवरील अपंग, महिला आणि वृद्ध लोकांच्या सुविधांची विशेष काळजी घेतली गेली. त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती  मतदारांना मतदान केंद्रावर पोचण्यास अडचण येऊ नये, यासाठी केंद्राच्या कक्षेत असलेल्या सर्व मार्गांवर दिशादर्शक फलक लावन्यात आले होते. कोरोना संबंधित सूचनाचे जागोजागी पोस्टर लावण्यात आले सोशल डिस्टन्स चे मार्किंग करण्यात आले होते.आदर्श मतदान केंद्रांवर मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणा घरे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प उपलब्ध होते. .

Protected Content