Home Cities भडगाव भडगाव तालुका तलाठी संघातर्फे मोरे अन रावळ यांचा सत्कार 

भडगाव तालुका तलाठी संघातर्फे मोरे अन रावळ यांचा सत्कार 


bhadgav news 1

भडगाव, प्रतिनिधी | नागपुर येथे नुकतेच ‘मदत’ या सामाजिक संस्थेकडून सुरेंद्र मोरे यांना अंसंघटित कामगार क्षेत्रात भरिव कामगिरी केल्याबद्द्ल राजश्री शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर पत्रकार गणेश रावळ यांना पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट लिखाण केल्याबद्द्ल डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

याबाबत आज (दि.२९) तालुका तलाठी संघटनेच्या वतीने टोणगाव तलाठी कार्यालयात सुरेंद्र मोरे व गणेश रावळ यांचा सत्कार तालुका सचिव राहुल पवार (तलाठी टोणगांव) ,योगेश बाम्हणे (तलाठी भडगांव), सुनिल मांडोंळे (तलाठी-अंतुर्ली), एस.एस. पाटील भाऊसाहेब (मंडळाधिकारी आमडदे) तसेच सामाजिक कार्यकर्ते शेरा पठाण यांनी केला.


Protected Content

Play sound