भडगावात फुड फेस्टीवलचे उद्घाटन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरात प्रथमच महिला बचत गट, गृहिणी व व्यावसायिक महिला माता- भगिनींना आपली पाककृती (खाद्य) रसिकांनसमोर आणण्याची संधी माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्या संकल्पेनेतून आमदार किशोरआप्पा पाटील युवा फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन भडगाव पाचोरा विधानसभेचे आ. किशोर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शहरातून ३५ महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता. या फेस्टिवलचे विशेष असे आकर्षक दिसून आले की, एकही स्टाँल डबल असा नव्हता सर्व वेगवेगळे प्रकाचे मेनू /वस्तू त्यात होते, व आयोजकांकडून कोणत्याही स्टाँल धारकांकडून कुठलीही फी आकरलेली नव्हती शिवाय आयोजकांकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. आ. किशोर पाटील व सुनीता पाटील यांनी प्रत्येक स्टाँलला भेट देऊन पदार्थांचा अस्वाद घेतला. माता भगिनींचे कौतुक करून प्रोत्साहन वाढवले तसेच शहरातील हजारो नागरिकांनी या फूड फेस्टिवलला भेट देऊन आनंद घेतला व या कार्यक्रमाचे कौतुक देखील केले.

Protected Content