राम होंडा शोरूम समोरून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील राम होंडा शोरूम जवळ राहणाऱ्या एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने मध्यरात्री चोरून नेल्याची घटना मंगळवारी १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, भूषण राजेंद्र देवरे (वय-३३) रा. राम होंडा शोरूम, कोर्ट परिसर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी कंपनीत नोकरी करून उदरनिर्वाह करतात. सोमवार १३ मार्च रोजी सायंकाळी कामावरून दुचाकीने घरी आले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या घरासमोर दुचाकी (एमएच १९ डीई ६३२९) ही पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार मंगळवार १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता समोर आला. त्यांनी परिसरात दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी दुपारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content