जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी समाज बांधवांतर्फे फुले मार्केट येथून भगवान झुलेलाल यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य मिरवणूक शनिवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता काढण्यात आली. यावेळी शहरातील सिंधी समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुज्य सिंधी सेंट्रल पंचायत , अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट आणि झुलेलाल उत्सव समितीच्या वतीने शनिवारी २ एप्रिल रोजी भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ४ वाजता सेंट्रल फुले मार्केट मधील मरीमाता मंदीरात पुजा करून सिंधी बांधवांनी भव्य शोभायात्रेला सुरूवात करण्यात आली. ही शोभायात्रा फुले मार्केट, शास्त्री टॉवर चौक, संत गोदडीवाला मार्केट चौक, छत्रपती शिवाजी महाराज रोड, कोंबडी बाजार, बी.जे.मार्केट, भगवान झुलेलाल मंदीर, संत कंवरराम चौक, सिंधी कॉलनी दरम्यान काढण्यात आली. यावेळी शहरातील सिंधी बांधवांनी संगिताच्या तालावर ठेका घेतला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी होती. यंदा कोरोना आटोक्यात आल्याने सर्व निर्बंध काढण्यात आले. त्यामुळे यंदा भगवान झुलेलाल यांची भव्य शोभायात्रेत सिंधी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3183525981930522
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/470375148163281
भाग ३
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/379181510534133
भाग ४
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/779389029645386