फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्त्यांचा व्यवसायावर कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच मागणाऱ्या सहाय्यक फौजदारासह दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी फैजपूर पेालीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे यावल तालुक्यातील रहिवाशी असून त्यांचे फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. पत्त्याच्या क्लबवर कोणतीह कारवाई करून साठी बामणोद बिटवरील पोलीस नाईक किरण अनिल चाटे (वय-४४) रा. विद्या नगर, फैजपूर आणि महेश ईश्वर वंजारी (वय-३८) रा. लक्ष्मी नगर, फैजपूर ता. यावल यांनी तक्रारदार यांच्याकडून ४ हजाराची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागात तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने शुक्रवारी २४ मार्च रोजी सापळा रचला. यावेळी तक्रारदार हे सहाय्यक फौजदार हेमंत वसंत सांगळे (वय-५२) रा. यावल रोड, फैजपूर यांच्याशी भेट घेतली. त्यानुसार सहाय्यक फौजदार यांनी बिट कर्मचारी किरण चाटे यांच्याशी बोलणे करून ४ हजाराची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदार यांनी ४ हजार रूपये दिले. ती रक्कम महेश वंजारी यांना दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने दोघांना रंगेहात पकडले. सायंकाळी उशीरापर्यंत तिसऱ्या संशयित आरोपी किरण चाटे याला देखील पोलीसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.ना. ईश्वर धनगर, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ सचिन चाटे, पोहेकॉ अशोक अहिरे, पोहेकॉ सुनिल पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोनाजनार्दन चौधरी, पोना किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळु मराठे, पोकॉ प्रदिप पोळ , पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ प्रणेश ठाकुर यांनी केली.