ब्रिटनकडून ऑक्सफर्डच्या कोरोना लसीला मान्यता

 

लंडन : वृत्तसंस्था| कोरोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करत असलेल्या ब्रिटनने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाकडून तयार करण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली आहे.

ब्रिटन करोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.

ब्रिटनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा नवा प्रकार फैलावत असून अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “औषधं आणि हेल्थकेअर उत्पादनं नियामक प्रशासनाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला सरकारने मान्यता दिली आहे”.

कोरोनामुळे जगभरात जवळपास १७ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमधीन वुहान येथून सुरु झालेल्या कोरोना व्हायसमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली. सध्या इतर देश कोरोना संकटामधून बाहेर पडत असताना ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत मात्र कोरोनाच्या नव्या विषाणूंनी थैमान घातला आहे. हा नवा प्रकार जास्त वेगाने परसत असल्याचं सरकार आणि शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी ब्रिटनसोबतचा व्यापार आणि विमानसेवा बंद केली आहे.

अ‍ॅस्ट्राजेनेका आणि कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या इतर कंपन्यांनी करोनाचा नवा प्रकार किती प्रभावी आहे याचा अभ्यास करत असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोरोनाची लस नव्या प्रकारावरही उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Protected Content