जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने जळगाव रेल्वेस्थानक येथून धम्म रॅलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. याप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थितीत होती
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवना भवनामध्ये रविवार २ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान राज्यस्तरीय तिसरे बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने कार्यक्रमाच्या सुरुवातीला जळगाव रेल्वे स्थानक येथून सकाळी ९ वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून धर्म रॅली काढण्यात आली. हि रॅली जळगाव रेल्वे स्टेशन, नेहरू पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेडियम चौक, नवीन बस स्थानक, स्वातंत्र्य चौकमार्गे गांधी उद्यान आणि लेवा भवन येथे काढण्यात आली. या रॅलीत संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर, बौद्ध साहित्य प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुक्राचार्य गायकवाड, भरत शिरसाट, राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, संयोजन समितीचे अध्यक्ष संजयसिंग वाघ, दिलीप जाधव, ॲड. राजेश झाल्टे, डॉ.एम.एस. पगारे, डॉ.माधवी खरात, पंढरीनाथ गायकवाड, अरविंद खैरनार यांच्यासह बौद्ध साहित्य प्रसार संस्था, बौद्ध साहित्य परिषद, धम्म जागृती रॅली समन्वय समिती, संविधान सन्मान रॅली समन्वय समिती, जिल्हा महिला समन्वय समिती यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.