जळगावात पत्नीवर पतीसह मित्राकडून अत्याचार; पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । पतीच्या मित्राकडून पत्नीवर अत्याचार केल्याची घटना शनीवारी समोर आली आहे. या संतापजनक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह त्यांच्या मित्रांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, धुळे येथील माहेरवाशीन महिलेचे शहरातील वाल्मिक नगरातील एका लहान व्यावसायिकाशी लग्न झाले. त्यांना दोन मुलेही आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे पतीचा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे पतीने मित्र रमेश काकडे (रा. प्रल्हादनगर, पिंप्राळा हुडको) याच्यासोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान, पती राहत असलेल्या भागात भाजीपाला विक्री करण्याची लाज वाट असल्याने मित्राच्या पिंप्राळा हुडकोच्या भागात २० मे पासून एका घरात भाड्याने राहू लागले. दरम्यान ८ जून रोजी रात्री जेवणानंतर पतीने पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्‍याचे सांगितले, यावरून दोघांमध्‍ये वाद झाला. अखेर रात्री पती बाहेरून परतल्यानंतर त्याने पत्नीला कोल्ड्रींग्स आणून तिला पाजले. अर्धातासानंतर तिला चक्कर आल्यानंतर पत्नी व त्याच्या मित्राने महिलेला बाथरूममध्‍ये नेले. नंतर पत्नीला पतीने पकडून ठेवल्यानंतर मित्र रमेश याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पतीने सुध्‍दा पत्नीवर अत्याचार केला. अत्याचार केलानंतर हा प्रकार कुणाला सांगितला तर मुलांना व पीडित महिलेला मारून टाकण्‍याची धमकी दिली. अखेर जुलै महिन्यात पतीने पत्नीला माहेरी पाठवून दिले. पीडितेने माहेरी येताच संपूर्ण घटना कुटूंबीयांना सांगितली. त्यानंतर याप्रकरणी शुक्रवारी उशिरा पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पती व त्याचा मित्र यांच्याविरूध्‍द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी करीत आहेत.

Protected Content