पारोळा प्रतिनिधी । लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित, सीबीएसई बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.नरेश पवार उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, शाळेचे प्राचार्य शोभा सोनी यांनी भारतीय वैज्ञानिक व नोबल पारितोषिक विजेते डॉ.सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रसंगी शाळेचे ऍडमिनिस्ट्रेटर विरेन्द्र सखा व संपूर्ण विज्ञान शिक्षक वृंद उपस्थित होते.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रा.नरेश पवार व शाळेतील सर्व विज्ञान शिक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.नरेश पवार सरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त माहिती देऊन विज्ञान विषयाबद्दल मुलांना प्रोत्साहित केले व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी वैज्ञानिक उपकरणे तयार करणे बाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य शोभा सोनी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक युगातील तंत्रज्ञान व विज्ञान याबाबतचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मल्होत्रा सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.