बोरावल आणि अंजाळे गरजूंना घरकुल द्या; मनसेचे बीडीओंना निवेदन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोरावल आणि अंजाळे गावातील नागरीकांना घरकुल मिळावे अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना दिले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यात आजपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी शासन ठामपणे राबवतांना दिसत नाही. ग्रामीण भागातील नागरीकांना हक्काचा निवारा देण्याच्या विविध योजना गतिमान करण्यासाठी महाआवास अभियान ग्रामीण भागात राबविले जावे यासाठी प्रयत्न होतांना दिसून येत नाही. यावल तालुक्यात बोराव व अंजाळे गावात सध्या अपुर्ण असलेली घरकुले तसचे अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तांवाना मान्यता देऊन १०० दिवसांच्या आता घरकुल पुर्ण करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. तसचे यावल तालुक्यात दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कल्याणकारी योजना राबविण्यात याव्यात. बाबत शासनाने गंभीर दखल घ्यावी व सर्वांना घरे देण्यात यावे अन्यथा यादीतील सर्व कुटूंबियांना सोबत घेऊन आंदोलन किंवा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी मनसेच्या जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, विद्यार्थी सेनेचे गौरव कोळी, आबिद कच्छी, रोहन धांडे, ऋषीकेश कानडे, अनिल सपकाळे, लक्ष्मण बारेला, भिमसिंग बारेला, दयाराम बारेला, आरती बंगर, हेमचंद्र चौधरी, जंगलू पवार, दिलीप पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content