बोदवड येथे विविध शासकीय योजनांची जागरण यात्रा (व्हिडिओ)

बोदवड, सुरेश कोळी | शहरासह जामनेर व बोदवड तालुक्यातील १४ गावांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पथनाट्याद्वारे देवून जनजागृती करण्यात येत आहे.

 

बोदवड शहरासह जामनेर व बोदवड तालुक्यात १४ गावामध्ये जिल्हा माहिती कार्यालय जळगाव, लोकरंजन बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या योजना यांचा जागरण यात्रेअंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. यात शासनाच्या योजनेबाबत पथनाट्य सादर करून योजनेची माहिती दिली जात आहे. गटई कामगारांच्या योजना, रमाई आवास घरकुल योजना, स्वसरोजगार योजना, शिष्यवृत्ती योजना अशा अनेक योजनेची माहिती सतीश सराफ व शिवाजी डोंगरे यांच्या पथनाट्याच्या माध्यमातून बोदवड बस स्थानक या ठिकाणी जनजागृती केली, या ठिकाणी उपस्थित कलाकार यांच्या साह्याने अतिशय उत्कृष्ट पथनाट्य सादर करून कार्यक्रम सादर केला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/806137397064559

 

Protected Content