बोदवड प्रतिनिधी – तुझ्या तक्रारी जास्त वाढल्या असल्याचे बोलून एकाला मारहाण करुन तिक्ष्ण हत्याराने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार २६ मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी नगराध्यक्षा पतीसह इतर सहा जणांवर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, बोदवडातील नईमखान युसुफ खान हा मंगळवार २६ मे रोजी रात्री गावातील बागवान मोहल्लातून दुचाकीने जात असतांना नगराध्यक्षा पती शेख सईद बागवान याने ‘तू माझ्या काळाज अर्ज फाटे जास्त करतो आणि या आगोदर तुला समजावून सांगितले होते तरी तू ऐकत नाही’ असे बोलून शेख सईद बागवान सह त्याचा भाऊ शेख असलम बागवान, शेख हाय्न बागवान, शेख रहिम बागवान, शेख दानिश बागवान, शेख इरफान बागवान आणि शेख साजित बागवान यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात शेख असलम बागवान याने नईमखान यांच्या डोळ्यावर लोखंडी पट्टी मारुन जखमी केले तर शेख हारुन बागवान याने धारदार शस्त्र मारुन गंभीर दुखापत केली. नईम खान यांच्या फिर्यादीवरुन बोदवड पोलीस ठाण्यात नगराध्यक्षा पती शेख सईद बागवानसह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉ. विलास महाजन करीत आहे.