बोदवड प्रतिनिधी । येथील शांतीलाल अॅग्रो मार्केटमधून १.३६ लाख रूपये मूल्य असणार्या मक्याच्या पोत्यांची चारी झाल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत वृत्त असे की, फिर्यादी शेख आशिकोद्दीन शेख अल्लाउद्दीन वय २६ बोदवड यांच्या फिर्यादी नुसार दिनांक ११ रोजी रात्री ८ वाजे पासुन ते दिनांक १२ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बोदवड शहरातील मनुर रोड वरील शांतीलाल पुखराज जैन अँग्रो मार्केट यार्ड मधून बोदवड गावी मार्केट यार्ड मध्ये मोकळ्या जागेत भरून ठेवलेले मक्याचे कट्टे चोरून नेले आहेत.
यात शे.आसिफोद्दिन शे.अल्लाउद्दीन; गजानन साहेबराव पाटील; गौतम ग्यानचंद जैन व शांतीलाल युवराज जैन यांच्या मालकीच्या मक्याच्या पोत्यांच्या समावेश होता. या संदर्भात बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाइदास मालचे करीत आहेत.