बोदवड तालुक्यात राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेतून ग्रामस्थांशी साधला संवाद

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बोदवड तालुक्यातील बोदवड तालुक्यातील राजूर, वरखेड बु, वरखेड खुर्द, निमखेड, एनगाव या गावात संवाद यात्रा काढून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांनी मार्गदर्शन केले.

 

ते म्हणाले की, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील नवीन -जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतून सुरु असलेली जन संवाद यात्रा ही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना केवळ मतदारांशी संवाद साधून वैयक्तिक समस्यासह गावोगावच्या अडिअडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने  सुरु असलेली ही संवाद यात्रा राज्यासाठी मॉडेल ठरू शकते, रोहिणी खडसे खेवलकर यांच्या मनातही विकासाची तळमळ असल्याचे यावरून दिसून येते. त्यांनी उचललेले हे पाऊल निश्चितपणे दिशादाई असून अभिनंदनीय आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेली चूक पुन्हा करू नका,आता यापुढे रोहिणीताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा “असे आवाहन केले.

 

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, व्हिजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, बोदवड राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबा पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष विलास राजपुत, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष दिपक पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील, नगरसेवक भरत पाटील, जाफर शेख, दिपक झंबड, हकीम बागवान, मुजमिल शाह, माजी पं.स. सभापती किशोर गायकवाड, अनिल वराडे, अनिल पाटील, भागवत टिकारे, दिपक वाणी, युवक तालुकाध्यक्ष विनोद कोळी, गोपाळ गंगतिरे, सम्राट पाटील, निलेश पाटील, शिवाजी ढोले, विलास देवकर, वामन ताठे, डॉ.ए.एन. काजळे, विजय चौधरी, जितेंद्र पाटील, प्रमोद धामोळे, रामराव पाटील, रवी खेवलकर, श्याम पाटील, फिला राजपूत, वाय.डी. पाटील, आनंदा पाटील, नईम बागवान, भगतसिंग पाटील, मुकेश कर्हाळे, कृष्णा पाटील, अजय पाटील, संदिप देशमुख, प्रदिप साळुंखे, अतुल पाटील, बाळाभाऊ भालशंकर, रणजित गोयनका, बबलू सापधरे, नंदकिशोर हिरोळे, चेतन राजपूत, संदिप पाटील, भैय्या पाटील, विकास पाटील, वंदना पाटील, प्रतिभा खोसे, कविता गायकवाड, वंदना पाटील, प्रतिभा खोसे, कविता गायकवाड, अश्विनी पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Protected Content