बोदवड प्रतिनिधी । बोदवड शहरासह तालुक्यात परिसरात बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आला.
या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कापणीवर आलेला गहू, मका, या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. असून शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. तालुक्यात वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत जिल्ह्णामध्ये कडक ऊन होते. सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाला बोदवड शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. थंड वारे वाहू लागले. बोदवड शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास १५ मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. असून शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडला आहे.
पाऊसामुळे नागरिकांच्या मनात शंकेचे वातावरण निर्मिती होत आहे एकीकडे कोरोनाचे मोठे संकट आणि कोरोना विषाणू ला प्रतिकूल वातावरण आहे त्यामध्ये पाऊस पडत आहे. एकीकडे शेतकऱ्याचे मोठे नुकसान तसेच सामान्य नागरिकांच्या हाताला काम नाही समस्या गंभीर आहे आणि पावसाने चांगल्याच प्रकारे तालुक्याला झोडल्याने शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण तयार झाले आहे.