बोदवड , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वराड गावात पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना गावातील नागरिकांना करावा लागत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेल कोरड्यापडल्याने भर उन्हळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
वराड गावात पाण्याच्या कोणताही नैसर्गिक स्त्रोत नसल्यामुळे गावाला एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान पानी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणी टंचाईची समस्या ही वराड गावाच्या पाचवीलाच पुंजलेली आहे असे दिसून येते. तसेच गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता दोन बोअरवेल असून त्यापण कोरड्या पडल्यामुळे लोकांना आता खूप त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने पाण्याचे अधिग्रहण करिता ठराव दिला असता यावर अद्याप ही मार्ग निघाला नाही….. तसेच गावातील सरपंच तथा गावकऱ्यांची मागणी अशी आहे की, आम्हाला पाणी द्या व एक ग्रामपंचायती करिता पाण्याचे टँकर द्या….. गावातील महिलांना कपडे धुण्याकरिता भांडी घासणे करिता गुरांच्या हौद मधील पाणी वापरायची वेळ आली आहे. यावेळी गावातील महिलांनी आपली व्यथा मांडतांना सागितले की, ही हेच पाणी आम्ही आता पिण्याकरिता वापरत आहे. तसेच जिल्हा परिषदने पाणी टंचाई दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.