बोदवडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची चावी हरवली !

 

 

बोदवड :  सुरेश कोळी । शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा बेजबाबदारपणा आज उघडकीस आला चक्क कार्यालयाची चाबी हरवल्याचे कार्यालय उघडण्याच्या वेळेत  संबंधितांच्या लक्षात आले

स्टेशन रोडवरील शालीमार टाॅकीजमागे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे   संबंधित कृषी कार्यालयाचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी हे किती बेजबाबदार आहेत याची प्रचिती आज सकाळी आली.

कार्यलय वेळेत उघडणे अथवा बंद करणं व चाबी सांभाळणं जबाबदारीचे काम आहे. कार्यालय प्रमुख म्हणून कृषी मंडळ अधिकारी यांनी कार्यालय वेळेत उघडलं किंवा नाही जबाबदार कर्मचाऱ्यांकडे चाबी व्यवस्थितरीत्या आहे की नाही? , हे पडताळून पाहणे आवश्यक आहे. मात्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर   सकाळी चक्क  चाबी गहाळ झाल्याने करवतच्या साहाय्याने टाळं तोडण्याची वेळ आली.

 

कार्यालयाची चाबी सांभाळणं मुश्किल आहे तर कारभाराबाबत न बोललेचं बरं असं म्हणण्याची वेळ आली आहे. चाबी हरविणे धक्कादायक असून चाबी चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडली असती व शासकीय महत्वाचे दस्तऐवज गहाळ झाले  असते तर जबाबदार कोण ? असा प्रश्न विचारला जात आहे  अशा बेजबाबदारपणाने वागणा-या कर्मचारी व अधिकारी वर्गावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.

 

Protected Content