चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे येथे ठेकेदारांकडून बांधण्यात येत असलेल्या शौचालये हे संथ गतीने सुरू असून सौचखड्डे बुजवण्यात न आल्यामुळे त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
तालुक्यातील बोढरे येथे हातगांव येथील विलास चव्हाण या ठेकेदारांकडून स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यात येत आहेत. मात्र सदर शौचालयाचे बांधकाम हे गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहेत. पावसाचे दिवस असल्याने काही लाभार्थ्यांच्या घरासमोरील सौचखड्डा बुजवण्यात न आल्यामुळे त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे बोढरे रोगराईला आमंत्रण दिले जाणार हे आता उघड झाले आहेत. याबाबत लाभार्थ्यांनी ठेकेदार विलास चव्हाण यांच्याकडे वारंवार तक्रार केली. परंतु प्रतिसाद शुन्य मिळत असल्याने लाभार्थी हे अक्षरशः कवटाळले आहे. याउलट शासकीय नियमानुसार सौचखड्डा किती फुटांपर्यंत असायला हवा. या गोष्टीचा किंचितही विचार न करता काही ठिकाणी दोन, अडिच , तीन फुटांपर्यंत सौचखड्डा खंदण्यात येत आहे. तर काहींचे अद्यापपर्यंत बाकीच आहे. त्यामुळे याबाबतीत ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळतांना दिसून येत आहे. दरम्यान प्रशासनाकडून याची सखोल चौकशी करण्यात येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत.