धूम्रपान न करताही होतो फुप्फुसाचा कर्करोग : सर्वेक्षणाचा निष्कर्ष

मुंबई प्रतिनिधी | धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होत असल्याचे आधीच सिध्द झालेले आहे. तर आता मात्र धुम्रपान न करणार्‍यांनाही मोठ्या प्रमाणात कॅन्सर होत असल्याचे एनआयएच या संस्थेच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

 

 

धूम्रपान न करताही अनेकांना फुप्फुसाचा कर्करोग होत असून शरीरातील नैसर्गिक प्रक्रियांमध्ये झालेल्या बदलाची परिणती असतो असा निष्कर्ष नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ (एनआयएच) या  संस्थेने काढला आहे. रेडॉन, वायू प्रदूषण, ऍस्बेस्टॉस यांसारख्या पर्यावरणातील धोकादायक अशा घटकांच्या माध्यमातून किंवा पूर्वी अस्तित्वात असलेले फुप्फुसाचे रोग यांच्या माध्यमातून काही धूम्रपान न करणाऱया व्यक्तींमध्ये होणाऱया कर्करोगावर प्रकाश टाकता येऊ शकतो. पण अजूनही शास्त्रज्ञांना हे कर्करोग कशामुळे होतात याचा पक्का निष्कर्ष काढता आलेला नाही.

 

हे संशोधन नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ (एनआयएच)चा भाग असलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूट (एनसीआय)मधील संशोधकांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय चमूने केले आहे. या अभ्यासातून ज्या व्यक्तींनी कधीही धूम्रपान केले नाही अशांमध्ये दिसून आलेली फुप्फुसाच्या कर्करोगातील तीन आण्विक उपप्रकारांवर प्रथमच प्रकाशझोत टाकला गेला आहे. हे संशोधन या आठवडयात  नेचर जेनेटिक्समध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Protected Content