बॉक्सर सतीश कुमारची उपांत्य फेरीत धडक

 

 

टोकियो : वृत्तसंस्था । भारतीय बॉक्सर सतीश कुमारने टोक्यो ऑलिम्पिकमधील पुरुष सुपर हेवीवेट कॅटेगरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने १६व्या फेरीत जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला ४-१ ने पराभूत केले.

 

सतिशच्या या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी भारताच्या आशा उंचावल्या आहेत.

 

पहिल्या फेरीत सतीशने प्रभावी खेळ करून पंचांची आणि उपस्थितांची मने जिंकली. तर, दुसऱ्या फेरीत त्याने अप्रतिम राईट हूक आणि बॉडी शॉट्स वापरून रिकोर्डोला चित केले. पहिल्या दोन फेरीत सतीशने रिकार्डोला गारद केल्याने तिसऱ्या फेरीत सतीशचा सामना करणं त्याला जवळपास अशक्य झालं. मात्र आघाडी घेतली असतानाही सतीशने कुठलाही धोका न पत्करता चतुराईने खेळत सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

 

सतीश कुमार मुळचा बुलंदशहरमधील पचौता गावचा आहे. त्याने पहिल्यांदा २०१० मध्ये उत्तर भारत एरिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर सतीशने नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक, २०१४ मध्ये झालेल्या आशियाई खेळामध्ये कांस्य पदक जिंकले. २०१५ मध्ये सतीशने आशियाई चॅम्पियनशिपमध्येही त्याने कांस्यपदक पटकावले होते.  २०१८मध्ये  कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक नावावर केले होते.

 

 

Protected Content