जामनेर प्रतिनिधी । तालुकयातील बेटावद बु येथील शेतकऱ्याची २५ हजार रूपये किंमतीची ट्रॅक्टरची ट्रॉलीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उखर्डू तोताराम काळे (वय-७१) रा. बेटावद बुद्रुक ता. जामनेर हे शेतकरी असून त्यांच्या शेतातच्या कामासाठी ट्रॅक्टर व ट्रॉली आहे. बेटावद ते बोदवड रोडवरील शेतात त्यांचे ट्रॉली (एमएच २८ ई १८५५) अज्ञात चोरट्यांनी ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी जामनेर पोलीसात उखर्डू काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जनार्दन सोनोने करीत आहे.