Home Cities एरंडोल धक्कादायक : आडगाव येथे मृत अर्भक आढळले

धक्कादायक : आडगाव येथे मृत अर्भक आढळले

0
122


एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव येथील एका प्लॉट भागात पाच महिन्याचे मृत अर्भक आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात महिलेवर कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील एका प्लॉट भागात गर्भातील अंदाजे ५ महिन्याचे अर्भकाला अज्ञात महिलेने फेकून दिले होते. या परिसरात राहणारे लहान मुले खेळत असतांना हा प्रकार लक्षात आला. यावेळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. गावातील पोलीस पाटील नितीन भुसारी यांनी धाव घेवून माहिती घेतली. पोलीस पाटील भुसारी यांनी कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांना घटनेची माहिती दिली. कासोदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान, गर्भातील साधारण पाच महिन्याचे अर्भक असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी पंचनामा केला. पोलीस पाटील नितीन भुसारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज कोळी करीत आहे.


Protected Content

Play sound