बेकायदेशीर ‘एचटीबीटी’ बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणी

धरणगाव प्रतिनिधी । राज्यातील सर्व कृषी केंद्रांवर बेकायदेशीर एचटीबीटी या घातक बियाणांची सर्रास विक्री केली जात आहे. अशा बेकायदेशीर बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय किसान संघ धरणगाव शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यातील कृषी क्षेत्रात बेकायदेशीर एचटीबीटी बियाणांची बेकायदेशीर विक्री केली जात आहे. याचा घातक परिणाम पर्यावरण व जैवविविधतेवर होणार आहे. सोबत भविष्यात होणाऱ्या कॅन्सर सारख्य आजारांना सामोरे जावे लागणार आहे. तंत्रज्ञानातील प्रगत बियाणे कंपन्यानी मनमानीपणे तयार केलेले जनुकिय परावर्तीत बियाणे हे भारतीय शेतीकरीता मारक ठरत आहे. या कंपन्यांनी तयार केलेले बेकायदेशीर बियाणांची विक्री करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे.

Protected Content