जळगाव प्रतिनिधी । शहरातील बेंडाळे चौकातील नागोरी चहाच्या दुकानाजवळ मुलाच्या हातातील मोबाईल मागून दुचाकीने येणाऱ्या अज्ञात दोघांनी जबरी हिसाकावून पळ काढल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मोहसीन खालीद बागवान (वय-१७) रा. जोशी पेठ पतंग गल्ली हा आपल्या आई वडीलांसह राहतो. गेल्या दोन दिवसांपासून घरी आलेल्या मावशीला सोडण्यासाठी शहरातील बेंडाळे चौकातील नागोरी चाहाच्या दुकानाजवळ आले. मोहसीनने मावशीला रिक्षात बसवून परत घराकडे जात असतांना मोबाईलवर मॅसेज चेक करत होता. दरम्यान मागून भरधाव वेगोन दुचाकीवर दोघांना येवून हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. मोहसीनने त्यांचा पाठलागही केला मात्र दोघे दुचाकीने फरार होण्यास यशस्वी झाले. मोहसीन यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील करीत आहे.