बुलढाणा प्रतिनिधी । येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झाल्यावरून दाखल करण्यात आलेल्या रूग्णाचा आज दुपारी मृत्यू झाला आहे.
बुलडाणा शहरात कोरोना संशयित रुग्णाला आज दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबिया येथून नुकताच दाखल झालेला हा रुग्ण सकाळी बुलडाणा येथील एका खासगी रुग्णालयात गेला होता. तेथून त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. संबंधित रुग्णाचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अर्थात कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याबाबत दोन दिवसानंतर रिपोर्ट कळणार आहे. त्याच्या परिवारालादेखील आता वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्याची मागणी होत आहे. तर कोणत्याही अफवांना बळी न पडता, नागरिकांनी संयम आणि शांतता बाळगावी असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.