बुलढाणा डाक विभागाकडून पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी । बुलढाणा भारतीय डाक विभागाकडून पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन इच्छुकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय डाक विभागाकडून पंधरा वर्षांपर्यंतच्या युवकांसाठी ‘ई-राईट मेसेज टू ॲण्ड अबाउट वर्ल्ड’ या विषयावर आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा १ मार्च २०२० रोजी आयोजित होणार आहे. या स्पर्धेसाठी इच्छुक मुला-मुलींनी इंग्रजी हिंदी किंवा मराठी यापैकी कुठल्याही एका भाषेत पत्र लिहायचे आहे. सदर स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, ३ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक २ हजार रुपये तसेच १ हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा www.post.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अधीक्षक बुलढाणा विभाग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content