बुधवारी कॉंग्रेसचा यावल तालुकास्तरीय मेळावा

यावल, प्रतिनिधी | यावल तालुका व शहर काँग्रेस मेळावा बुधवार १५ डिसेंबर रोजी शेतकी संघ येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

आगामी जिल्हापरीषद, पंचायत समिती यावल तालुका व सह संस्थाच्या निवडणूकी संदर्भात यावल तालुका व शहर काँग्रेस युवक काँग्रेस, महीला काँग्रेस, अल्पसंख्यांक सेल, वैद्यकीय सेल लिगल सेल, किसान सेल, मागासवर्गीय सेल, ओ. बी. सी. सेल.च्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जळगाव काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार हे असणार आहेत. तर उद्घाटक सत्कार्थी हे प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरिष चौधरी असणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, योगेंद्रसिंग पाटील, माजी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब संदिप पाटील, माजी आमदार रमेश चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष तथा जि.प. गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, काँग्रेस यावल कमेटी अध्यक्ष कदीर खान करीम खान आदींनी केले आहे.

Protected Content