पाचोरा येथून अल्पवयीन मुलीला पळविले; अज्ञातावर गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील एका शहरात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाचोरा शहरातील एका शाळेच्या गेटवरून अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका खेडे गावात राहते. अल्पवयीन मुलगी पाचोरा शहरातील एका शाळेत शिकायला आहे. शुक्रवार 10 डिसेंबर रोजी दुपारी मुलगी शाळेत गेली होती. दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान शाळेत गेटवर उभी असताना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. मुलीचा सर्व शोध केला असता मिळून आली नाही. अल्पवयीन मुलीच्या वडीलांच्या खबरीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास पाटील करीत आहे.

Protected Content