बुकी अनिल जयसिंघानीला ईडीने केली अटक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी याला ईडीने अटक केली आहे.

सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने बुकी अनिल जयसिंघानी याला अहमदाबादमधून अटक केली आहे. त्यांच्यावर १० हजार कोटीचा मनी लॉंड्रिंग केल्याचा आरोप आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे जयसिंघाने हा प्रसिध्दीच्या झोतात आला होता. तो कुख्यात बुकी असून एका प्रकरणात सात वर्षांपासून फरार होता. त्याला कायदेशीर पेचातून काढण्यासाठी अनिक्षा हिने कथितरित्या अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

दरम्यान, गेल्या सात वर्षापासून जयसिंघानी फरार होते. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. अमृता फडणवीस यांच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिस शोध घेत होते. अखेल गुजरातमधून त्याला अटक करण्यात आली आहे.

Protected Content