जळगाव राहूल शिरसाळे । महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती करून ज्या पध्दतीत आमच्या विरूध्द उमेदवार देण्यात आले होते. अगदी त्याच पध्दतीत बिहारमध्ये जेडीयूच्या विरूध्द उमेदवार देण्यात येत आहेत. यामुळे महाराष्ट्र पॅटर्नची तेथे पुनरावृत्त करण्यात येत असल्याचा आरोप पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केला. आज वीज वितरणच्या कार्याबाबत आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतली. यात त्यांनी विज वितरणला अलीकडच्या काळातील सर्वाधीक १६ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती दिली. इतका मोठा निधी आल्यानंतरही काही शेतकर्यांची कामे होत नसल्याच्या तक्रारी समोर येत असल्याची दखल या बैठकीत घेण्यात आली असून या संदर्भात संबंधीतांना सूचना देण्यात आल्याचे ना. पाटील महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती करून ज्या पध्दतीत आमच्या विरूध्द उमेदवार देण्यात आले होते. अगदी त्याच पध्दतीत बिहारमध्ये जेडीयूच्या विरूध्द उमेदवार देण्यात येत आहेत. यामुळे महाराष्ट्र पॅटर्नची तेथे पुनरावृत्ती करण्यात येत असल्याचा आरोप पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केला.
दरम्यान, एकनाथराव खडसे हे कुठेही गेले तरी त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचे पालकमंत्री म्हणाले. आपले खडसे यांच्या सोबत काही प्रमाणात मतभेद होते व आजही आहेत. तथापि, ते खूप मोठे नेते असून ते शिवसेनेत येवो की, राष्ट्रवादीत याचे आपण स्वागतच करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/643408966317674/