बिहारमधील नेते मास्क न घालताच भाषण देत आहेत

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । बिहारमधील निवडणुकांमध्ये नेते मास्क न घालताच भाषण देत आहेत, लोक सभांमध्ये शारीरिक अंतराचे पालन करताना दिसत नसल्याची माहिती मिळाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिले आहे. कोविड-१९ कहर पाहता सर्व राजकीय पक्षानी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे निर्देश आयोगाने दिले आहेत. आयोगाने ९ ऑक्टोबर जारी केलेल्या सूचनांची आठवण या पत्राद्वारे सर्व राजकीय पक्षांना दिली आहे. .

मास्क न घालताच आणि शारीरिक अंतराचे पालन करणारे नेते किंवा उमेदवार हे निवडणूक आयोगाच्या गाइडलाइन्सचेच केवळ उल्लंघन करत नसून ते स्वत:ला आणि जनतेला देखील संकटात टाकत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने अशा सभांची दखल घेतली आहे. आयोगाने अशा सर्व नेत्यांची माहिती घेऊन राज्याच्या निवडणूक विभागाच्या सीईओ आणि जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी आयोग स्वतंत्र निर्देश जारी करत आहे.

निवडणुकीच्या सभांमध्ये नेते एकमेकांना हात मिळवणार नाहीत, तसेच ते गळाभेट देखील करणार नाहीत, . बंद हॉलमध्ये एखादा कार्यक्रम होत असल्यास तेथे २०० हून अधिक लोक भाग घेऊ शकत नाहीत, सभा खुल्या मैदानावर होत असेल, तर सर्व उपस्थित लोकांनी मास्क घालणे गरजेचे असेल. तसेच सभेला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीपासून सहा फुटांचे अंतर राखणे आवश्यक आहे, असे निर्देश देण्यात आले होते.

. आयोजकांनी सभेच्या ठिकाणी टिश्श्यू पेपरची व्यवस्था केली पाहिजे. आयोजन स्थळावरील स्वच्छतेची जबाबदारी देखील आयोजकांचीच असेल. मात्र बिहार निवडणुकीसाठी होत असलेल्या प्रचार सभांमध्ये या मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसवल्या जात असल्याचे दिसत आहे.

Protected Content