बिलखेडा येथे भर दिवसा घरफोडी

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बिलखेडा येथील पुंडलिक सुरेश भदाणे यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून साडेपाच तोळे सोन्याचे दागिने व एक लाख १० हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली.

या संदर्भात पुंडलिक सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादित नमूद केले आहे की, मी सकाळी मुलगा धनराज याचा अडमिशन घेण्यासाठी त्याच्या सोबत धरणगावला गेलो होतो.तसेच पत्नी सुष्माबाई ,मुलगी सायली व आई रत्नाबाई हे घरातील कामे आटोपून घराला कुलूप लावून शेतात गेले असता अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात असलेल्या सोन्याच्या एकूण ५६ ग्रम वस्तू व रोकड ७० हजार तसेच वडिलांचे ४० हजार असे एकूण १ लाख १० हजार रुपये चोरुन नेले आसल्याचे मी घरी परत आल्यावर समजले.त्यात ८ ग्रॅम वजनाचे कानतील सोन्याचे टोंगल , ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टाप्स, अडीच ग्रॅम वजनाचा बाह्या , साडेतीन ग्रॅम वजनाचे काप , १५ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसुत् पोत , ५ ग्रॅम वजनाची अंगठी , साडेतीन ग्रॅम वजनाचे पेंडल , अडीच ग्रॅमची अंगठी , १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन , तसेच माझे ७० हजार व वडिलांचे ४० हजार असे एकूण एक लाख १० हजाराची रोकड चोरांनी लंपास केल्याचे पुंडलिक पाटील यांनी सांगितले. जूने बाजार भावाने पोलीसांनी दागिन्याःची किंमत नोंद केली असली तर आजच्या बाजार भावाने या ५६ ग्रॅम सोन्याची किंमत २ लाख ६० हजार असल्याचे पुंडलिक पाटील यांनी सांगितले.

श्‍वान पथकाने घेतला शोध

या घटनेची माहिती मिळताच सपोनि पवन देसले, सपोनि गणेश आहिरे, पो.उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, बिट हवलदार खूशाल पाटील, पो हेका कोळंबे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन श्‍वान पथ व फिंगर प्रिंन्ट तज्ञांना पाचारण करुन अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला.

पत्ता विचाराणारा तो कोण ?

दरम्यान, पुंडलिक पाटील हे धरणगावला गेले असता एका इसमाने नाना मिठाराम पाटील यांना त्यांचा पत्ता विचारला होता.त्यामुळे हा पत्ता विचारणारा अज्ञात इसम कोण ? त्याच्या अवती-भोवती पोलीसांची तपासाची चक्रे फिरत आहे. हा इसम माहितगार असल्याची चर्चा असून त्याने ज्या पेटीत रोकड ठेवली होती तिच बरोबर उघडून रक्कम लांबवाली आहे.तसेच कपाटातील सर्व दागिनेही सुव्यवस्थितपणे काढून नेले आहेत.

गुन्हा दाखल…तपास सुरु

या घटने संदर्भात धरणगाव पोलीसात पुंडलिक सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादवि ३८० , ४५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्र.अधिकारी सपोनि पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश अहिरे हे करीत आहेत.

Protected Content