मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे सांगून जिवंत झाडाची केली कत्तल !

 

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील प्रोफेसर कॉलनीतील मुकेश मेडिकल जवळील रहिवाशी किरण गोपाळ महाजन यांनी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी झाड कापण्याची परवानगी मिळण्याचा अर्ज नगरपरिषदेकडे सादर केला होता. मात्र, नगरपरिषदेची परवानगी मिळण्यापूर्वीच त्यांनी झाड तोंडल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, किरण गोपाळ महाजन राहणार प्रोफेसर कॉलनी भागातील असून यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी खड्डे खोदण्यात आले असून दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी माझ्या घरासमोर असलेल्या झाडाखालून नगरपालिकेची नळाची पाईपलाईन तोडून टाकलेली आहे.व त्या झाडाच्या मुळांमुळे वारंवार पाईप तुटून लिकीज होत असते व त्यामुळे ते झाड केव्हा जमिनदोस्त होईल व त्यापासून जीवित मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. त्या कारणाने सदरचे झाड मला तोडण्याची परवानगी मिळावी असे अर्ज मुख्यधिकारी नगरपरिषद भुसावळ यांच्याकडे किरण गोपाळ महाजन दिला होता.
सदर दिलेल्या अर्जाची नगरपरिषदेकडून कुठलीही परवानगी देण्यात आलेली नसून अर्जदाराने दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी उभे असलेले जिवंत झाडाची कत्तल करून परस्पर विल्हेवाट लावण्याबावत सूत्रांकडून माहिती मिळताच घटनास्थळी पत्रकार पोहचून विचारणा केली असता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आम्हाला झाड कापण्याची परवानगी दिली असल्याचे अर्जदाराने सांगितले व प्रभाग क्रमांक २२ मधील नगरसेविका सुषमा किशोर पाटील यांचे पती किशोर पाटील यांच्याशी मोबाईल वरून वार्तालाब करून दिला.त्यावेळी किशोर पाटील म्हणाले की आमच्याकडे झाड कापण्याची परवानगी आहे तुम्ही मुख्याधिकारी यांना जाऊन भेटा.

मुख्याधिकाऱ्यांनी झाड कापण्याची कुठलीही परवानगी दिली नाही ….
भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची भेट घेतली असता प्रोफेसर कॉलनी भागातील कुठल्याही अर्जदारास नगरपरिषदेने झाड कापण्याची परवानगी दिलेली नाही.त्या अर्जदारास घर बांधकाम करण्याची परवानगी दिलेली आहे. असे स्पष्टीकरण मुख्याधिकारी यांनी दिले.विना परवाना झाड कापण्यासप्रकरणी अर्जदारविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुख्याधिकारीना पत्रकारांना दिली.

Protected Content