बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; परिसरात भितीचे वातावरण

भडगाव प्रतिनिधी । भडगाव ते एरंडोल रस्त्यावर असणार्‍या शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत वृत्त असे की, एरंडोल रस्ता लगत असलेल्या टिसीडी फार्मच्या मागील भागात शेतकरी शांताराम निंबा पाटील यांचे शेत असुन शेतात त्यांनी मका लागवड केली आहे. त्यांनी पाळलेली गुरे ते रात्री शेतातच बांधतात. त्यांनी दि. २६ रोजी सायंकाळी शेतात गाय, दोन बैल, एक गोर्‍हा बांधुन घराकडे आले होते. रात्रीच्या सुमारास शेतात मोकळ्या जागेत बांधलेल्या पाळीव प्राणी पैकी गायीवर बिबट्याने हल्ला करत गाईला ठार करुन पोट फाडुन गायीचा डावा पाय तोडुन बिबट्या पसार झाला आहे.

शेतकरी शांताराम पाटील हे सकाळी शेतात गेले असता हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. याबाबत वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. या घटनेचा वनविभागाचे अधिकारी वनपाल सरीता पाटील, आमडदे वनरक्षक बी. सी. पाटील व भडगाव येथिल प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डा. गवळी यांनी पंचनामा केला आहे.

यापुर्वी २३ जानेवारी रोजी याच परीसरात शेतमजुर युनुस पिंजारी यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. बिबट्याचा या परीसरात असलेला वावर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली होती. वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले असते तर गाईचे प्राण वाचले असते. गायीवर हल्ला झालेला परीसर पासुन भडगाव हद्दीतील पेठ परीसर जवळ असल्याने या परीसरातील शेतकरी व रहिवाशी यांच्यात दहशत पसरली आहे. वनविभागाने बिबट्यास तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी केली आहे.

दरम्यान, बिबट्याने हल्ला केलेल्या नंतर घटना स्थळी उर्वरीत शिकार त्याजागी शिल्लक ठेवल्याने शिकार खाण्यासाठी बिबट्या पुन्हा येईल. या अक्षेपेने घटना स्थळी वनविभागाचे कर्मचारी आमडदे वनरक्षक बी.सी.पाटील व भडगाव नाकेदार दराडे यांनी घटनास्थळी रात्री व ट्रॅप कॅमेरा लावला असल्याची माहिती भडगाव वनरक्षक सरीता पाटील यांनी दिली आहे.

Protected Content