अलीबाग । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली.
सविस्तर वृृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
ना. बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी अलिबाग तालुक्यातील नागांव, चौल, काशीद, मुरुड, त्याचबरोबर आगरदांडा ,दिघी, दिवेआगार व तुरुंवडी या भागातील नुकसान ची पाहणी केली. कोरोना पाठोपाठ राज्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने निसर्गाचा वरदहस्त असलेल्या कोकणात मोठे नुकसान केले आहे. या चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकर्यांचे नारळ सुपारी व आंब्याच्या बागा जमीनदोस्त झाले आहेत. त्याचबरोबर हरणे अंजिरा, केळशी पट्टीत नारळ-पोफळीच्या बागा ,दापोली व किनारपट्टीच्या परिसरात घरे, त्याचप्रमाणे अनेक मच्छीमारांच्या बोटी चे नुकसान झाले आहे. हे निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावाने या भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकर्यांचे नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन केली या वेळी तेथील शेतकर्यांच्या व नुकसान ग्रस्तांच्या समस्याही त्यांनी ऐकून घेत महसूल विभाग व प्रशासनाला तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पर्यटन राज्यमंत्री नामदार आदिती तटकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेश ही ना. थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.