पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसु – धापेश्वर परिसरातील विनाशकारी रिफायनरी प्रस्थापित करण्यात येवु नये. या रास्त मागणीसाठी उत्तर महाराष्ट्र विभाग पर्यावरण बचाव कृती मंचतर्फे पाचोरा तहसिलदार प्रविण चव्हाणके यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी मिनाक्षी विराजदार, संतोष पाटील, सपना भुसारे, रेखा पाटील, अंजली चव्हाण, अभिलाषा रोकडे, एस. चव्हाण, संभाजी नागणे, मनिषा वाणी हे उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हायातील राजापुर तालुक्यातील नियोजित रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोलियम लिमीटेड या
नियोजित प्रकल्पामुळे प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे कोकणातील निसर्ग व सागरी जैवविविधतेवर दुरगामी परिणाम होणार असल्यामुळे जागतीक दर्जाची ओळख असणाऱ्या जगप्रसिद्ध रत्नागिरी हापुस व काजु नारळ आणि सुपारी या बागावरीती ही परिणाम होणार आहे. शिवाय प्रकल्पातील प्रस्थापित गावात देवाचे गोठणे हे जगप्रसिद्ध गाव येते. या गावामध्ये पुरातन काळातील शिल्प आढळून आले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत देवाचे गोठणे या परिसराला जगप्रसिद्ध स्थान मिळाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा या परीसरावरतीही परिणाम होणार आहे. कोकणवासीयांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी असुन या प्रकल्पामुळे समुद्रात विषारी रासायनिक आणि
केमीकल युक्त गरम पाणी मिसळल्यामुळे त्याचा परिणाम मासेमारी या व्यवसायावरती होणार आहे. या प्रकल्पातून परिसरामध्ये पसरणाऱ्या वायुमुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावरती ही याचा परीणाम होणार आहे. एकंदरीत कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेला असुन आंबा, काजू, नारळ सुपारीच्या बागा, मासेमारी व्यवसाय टिकावा अशी स्थानिकाची भूमिका आहे. आणि त्याचबरोबर आमच्या मंच ची सुध्दा हीच भूमिका आहे. त्यामुळे या प्रकल्पाला परवानगी नाकरण्यात यावी. अशा आषयाचे निवेदन पाचोरा तहसिलदार प्रविण चव्हाणके यांना देण्यात आले आहे.