लाईव्ह ट्रेंड्स न्यूजचा चाळीसगावच्या स्वच्छतादुताशी संवाद ! (व्हिडिओ)

 

 चाळीसगाव, जीवन चव्हाण । रविवार म्हटलं की, सर्वांसाठी मौजमजा करण्याचा दिवस असतो. मात्र याला चाळीसगाव बस आगारातील चालक विजय शर्मा अपवाद आहे. दर रविवारी ते सहा तास शहराच्या विविध भागात स्वच्छता करतात. याबाबत त्यांचं सर्वत्र कौतुक होत असून लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या प्रतिनिधीने  त्यांच्याशी साधला खास संवाद .

विजय मदनलाल शर्मा ( वय-४६ रा. हुडकोनगर, चाळीसगाव) हे २००४ मध्ये परिवहन महामंडळात चालक पदावर रूजू झाले. २६ जानेवारी २०१८ रोजी ‌त्यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वच्छतेला सुरूवात केली. शर्मा हे दर रविवारी शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन सहा तास झाडूने स्वच्छता करतात. चाळीसगावात ते ‘मेरा गाव मेरा तीर्थ’ या नावाने स्वच्छता मोहीम राबवित आहे. वेळोवेळ्या भागात स्वच्छता करत असताना कोणी फोटो घेतात तर कोणी शर्मा यांच्याबद्दल विचारपूस करतात. शर्मा यांच्या कार्याचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. तसेच शर्मा यांनी भीक मागणाऱ्या ५० मुलांमधून ३० मुलांत प्रबोधन करून शाळेच्या प्रवाहात आणलं.

https://www.facebook.com/508992935887325/videos/432065174657699

Protected Content