बामसेफच्या ३५ व्या राज्य अधिवेशनात विविध सत्रांद्वारे समाज प्रबोधन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बामसेफचे दोन दिवशीय ३५ वे राज्य अधिवेशनाचे ला. ना. विद्यालयाच्या कै. भैय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.  या अधिवेशनात विविध सामजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

बामसेफच्या अधिवेशनाचे काल शनिवार दि. २७ ऑगस्ट रोजी  डॉ. प्रदीप आगलावे यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले. हा उद्घाटन समारोह   बामसेफ राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दीपा श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी  लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, बी . डी. बोरकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.    यावेळी प्रास्ताविक संजय पगारे,  यांनी तर  सूत्रसंचालन जे. एच. चव्हाण यांनी केले. आभार  रवींद्र मोरे यांनी मानले.

यानंतर घेण्यात आलेल्या प्रबोधन सत्रात जाती आधारित जनगणनेबाबतीत लोकांच्या इछेचे दमण : लोक उद्रेकाला आमंत्रण ! याविषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी सत्यशोधक ओबीसी संघाचे नेते उल्हास  राठोड , छत्रपती शिवजी महाराज मुस्लीम ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष अकीफ डफेदार, विधीज्ञ अॅड. अभिमान हाके पाटील यांनी आपले विचार मांडले. सत्राचे अध्यक्ष म्हणून बामसेफ संघटन सचिव एम. डी. चंदनशिवे हे उपस्थित होते. प्रस्तावाना इंजी. नितीन भटकर यांनी तर सूत्रसंचालन राजेश गवई  यांनी केले. आभार आर. पी. साळवे यांनी मानले. प्रतिनिधी सत्रात बीएस 4 अभियान : संविधानवादाचे व्यावहारिक पैलू आणि क्रियान्वयन या विषयावर  राष्ट्रीय संघटन सचिव संजय मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली   समूह चर्चा करण्यात  आली.  या सत्राचे  प्रास्ताविक जितेंद्र सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन अरुण गोडघाटे यांनी केले. आभार ललिता शिरसाठ यांनी मानले.

अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज रविवार दि. २८ ऑगस्ट रोजी प्रबोधन सत्र २ मध्ये धर्माधारित देशाचा आग्रह – एक राष्ट्रघातकी पाऊल ! या विषयावर चर्चा करण्यात आली. ही चर्चा केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. विनोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी डॉ. सरोज डांगे, प्रा. गणपत धुमाळ, नितीन सावंत यांनी आपले विचार प्रकट केलेत. या सत्राचे सूत्रसंचालन रवींद्र किर्तीकर यांनी तर प्रस्तावना पंडित चोपडे यांनी केली. आभार कविता माडवी यांनी मानले.

 

दरम्यान, बामसेफचे संघटन सचिव एम. डी. चंदनशिवे यांनी लाईव्ह ट्रेंड्स या अधिवेशन आयोजना मागील भूमिका मांडली. देशात सामाजिक व्यवस्था परिवर्तनाचा  महापुरुषांचा जो लढा आहे त्याला गतिमान करण्याचे काम बामसेफच्या माध्यमातून गेल्या  ४३ वर्षांपासून सरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध विषयांवर प्रबोधन करणे, संघटनात्मक गतिविधी समजला अवगत करणे याकरिता अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सपष्ट केले. राज्य अध्यक्ष संजय पगारे यांनी आपली भूमिका मांडतांना सांगितले की, भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा, रक्षण आणि अभिमान या चार तत्वांना येथील कार्यकर्ते प्रेरित होवून याचा प्रचार प्रसार अधिवेशनात सहभगी कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/444737020754793

 

Protected Content