बापरे…! विद्युत कॉलनीत सर्पमित्राने पकडला ‘कोब्रा’ (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विद्युत कॉलनी परिसरात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास नीरज तिवारी यांच्या घराबाहेर कोब्रा (नाग) हरीवठ्ठलनगर येथील सर्पमित्र जगदिश बैरागी यांनी पकडला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.

परिसरातील रहिवासी यांच्यात मोठी भीती निर्माण झाली होती. बैरागी म्हणाले , सध्या पावसाळ्याचे दिवस असून नागरिकांनी अडगळीचा सामान , अनावश्यक वस्तू निकाली काढणे गरजेचे असून स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.अनेक लहान बिळ असतात आणि त्यात सर्प येऊन बसतात. नागरिकांना आवाहन आहे की, जून ते ऑक्टोबर या काळात जमिनीवर झोपणे टाळा. शेताचे काम करतांना काळजीपूर्वक काम करा. सर्प दंश व्हायला नको याकरिता रात्री अंधारात जाणे टाळा, असे त्यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या विषारी नागाला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. साप पकडण्याचे नाट्य जवळजवळ चाळीस मिनिट रंगले.

https://www.facebook.com/watch/?v=299448067894770

Protected Content