ग्रामपंचायत सदस्याने संपविले जीवन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जळके वसंतवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

राजेंद्र भगवान ब्राह्मणे (वय ३६, रा. जळके, ता. जि.जळगाव ह.मु.जळगाव, ) असे मयत तरुण ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र ब्राम्हणे हा जळगाव शहरातील पांडे चौकातील एका हॉस्पिटलमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून कामाला होता. जळगाव येथेच तो स्थायिक होता. बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास जळके येथील भगवान पुंडलिक पाटील यांच्या शेतात गेला व तिथे गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील संजय चिमणकारे व प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी धाव व घेतली. म्हसावद पोलीस दुरक्षेत्राचे स्वप्निल पाटील व प्रदीप पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला. राजेंद्र यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. राजेंद्र यांच्या वडिलांचे निधन झालेले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार करीत आहे.

 

Protected Content