बांबरुड खु (महादेवाचे) विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथून जवळच असलेल्या  बांबरुड खुर्द (महादेवाचे) विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

बांबरुड खुर्द (महादेवाचे) विद्यालयातर्फे गावात प्रभात फेरी काढून हर घर तिरंगाचा संदेश व घोषणा देण्यात आल्यात.  यावेळी विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली.   त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांचा महिला मेळावा व स्वातंत्र्यसैनिकांचे मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावाचा व राष्ट्राचा इतिहासांबाबत मार्गदर्शन करून पर्यावरण जनजागृती व हरघर तिरंगा याबाबत शपथ सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांनी यावेळी घेतली. त्यानंतर पालकांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणामध्ये  वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.  बापूसो पुं. का. पाटील यांच्या प्रतिमापूजनाने दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सुवर्णा पाटील होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून बांबरुड खु” गावाचे सरपंच मनीषा पाटील तसेच माजी महिला सरपंच चित्रा पाटील, मंदाकिनी पाटील, संगीता बागुल, बी. एस. एफ. जवान गणेश अहिरे, आर्मी जवान राहुल पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात महिला मेळावा घेण्यात आला. यात संस्थेच्या संचालिका, आजी – माजी सरपंच महिला, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शालेय पोषण आहार स्वयंपाकी महिला गावातील विविध पदाधिकारी महिला तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या आई, शिक्षिका असा एकत्रित महिला मेळावा पहिल्या टप्प्यात झाला. त्यानंतर बी. एस. एफ. जवान गणेश अहिरे व योगेश बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले. सैनिकांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रभावना व एकात्मता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश खंडागळे, इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वाती पवार, प्रास्ताविक सुधाकर सोनवणे तर उपस्थितांचे आभार नितीन मोरकर यांनी मानले.

 

Protected Content