जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील बहुजन कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले आले. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा, इशारा आंदोलकांनी दिला आहे.

बहुजन कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासन विरोधात तसेच डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या मागण्यांसाठी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन बहुजन कर्मचारी संघटनेचे विनीत पाटील, सुनील धाडी, गजानन पाटील, अनिल पाटील, कविता पाटील, दीपक शिंपी, विवेक पाटील यांसह विविध कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. डाटा एंट्री ऑपरेटर कविता पाटील यांसह जिल्ह्यातील ६ कर्मचाऱ्यांना २ वर्षाच्या पगारासह जिल्हा परिषदेच्या शासन सेवेत समाविष्ठ करण्यात यावे, जामनेर तालुक्यातील वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मयत कर्मचारी रामलाल सोनवणे यांच्या कुटुंबियांना तात्काळ पेन्शनचा लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1990122234512957