उदयपूर हत्याप्रकरणी दोषींवर त्वरित कार्यवाही व्हावी – तेली समाजाची मागणी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राजस्थान उदयपूर येथील कन्हैयाकुमार हत्याप्रकरणी दोषींवर त्वरित कार्यवाही व्हावी. या मागणीसाठी तेली समाज मुक्ताईनगर तालुकातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात “राजस्थान उदयपूर येथील घंटाघर पोलीस स्टेशन अंतर्गत मालदास स्ट्रीटवर कन्हैया कुमार या युवकाची गळा कापून हत्या करण्यात आली. या क्रूर घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. या युवक तेली समाजाचा असून टेलरिंग व्यवसाय करीत होता. या घटनेने तेली समाजात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. दोशींवर सक्त कारवाई करून आमच्या खालील मागण्या राजस्थान सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे पाठवण्यात याव्यात. हि अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

 या निवेदनात दोषींना फाशी देण्यात यावी, पीडित कुटुंबीयांना पूर्ण संरक्षण द्यावे, पीडित पीडित कुटुंबातील तरुण मुलाची हत्या झाल्याने पीडित कुटुंबाला पुढील संपूर्ण जीवन जगण्यासाठी, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी शासनाने घ्यावी आदी. मागण्या करण्यात आल्या असून त्या पूर्ण न झाल्यास तेली समाज तीव्र आंदोलन करेल.” असा इशारा करण्यात आला आहे.

निवेदन देतांना तेली समाज बांधव उपस्थित होते. विठ्ठल कडू तळले अध्यक्ष तेली समाज मुक्ताईनगर, धनंजय सापधरे, जयंत खेवलकर, शुभम तळले, मनोज तळेले, निलेश जावरे, विष्णू काठोके, सुरेश मडवाले गजानन मालगे, वसंत भलभले, प्रवीण तळेले, संजय कपले, लक्ष्मण सापधरे, अनिल चौधरी, योगेश मनसुटे, अजय मनसुटे, राजेंद्र तळेले, लक्ष्मण मनसुटे, प्रकाश खेवलकर, संतोष जावरे, नीरज बोराखडे, जनार्दन तायडे, नरेंद्र सापधरे, विजय काटोके, संतोष साप धरे यांच्या समवेत तेली समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content