जळगाव प्रतिनिधी । शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळून दोन महिला पायी जात असतांना अज्ञात चोरट्याने एकाच्या गळ्यातील १६ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत तोडून फरार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली महिती अशी की, आशा भगवान बारी (वय-२८) रा. साई बाबा मंदीर जवळ, समता नगर ह्या आपल्या आईसोबत बहिणाबाई उद्यानाजवळून १७ मार्च रोजी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास पायी जात असतांना मागुन अज्ञात २० ते २५ वयोगटातील चोरटा येवून आईच्या गळ्यातील १६ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत जबरी तोडून भास्कर मार्केटकडे पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी आशा बारी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र बोरसे करीत आहे.