बहिणाई ब्रिगेडतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन

 

जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेड तर्फे आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला .जिल्हा अध्यक्ष बहिणाई ब्रिगेड सुनीताताई नारखेडे यांच्याहस्ते बहिणाबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन करतांना अ.भा लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप (बंडू) भोळे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ कोल्हे, बहिणाई ब्रिगेडच्या नवनिर्वाचित महानगराध्यक्षा  साधनाताई लोखंडे, . हर्षाताई बोरोले, कांचनताई आटाळे, उद्योजक उमाकांत जावळे, उद्योजक प्रशांत बाणाईत, श्रिकांत मोरे, सागर येवले आदी उपस्थित होते.

दरम्यान सर्वांनी बहिणाबाईंची ‘संसार’ ही कविता सामुहिकरित्या म्हटली. साधनाताई लोखंडे यांची बहिणाई ब्रिगेडच्या महानगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या निवड बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष आशाताईं कोल्हे यांनी केली, तसेच नियुक्ती पत्र आ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप (बंडू) भोळे यांचे हस्ते देण्यात आले. तसेच बहिणाई ब्रिगेडच्या संघटनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Protected Content