बससेवा पूर्वरत सुरु करा, मुक्ताईनगर तालुका काँग्रेसची मागणी

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । येथील बस सेवा बंद असल्याने सामान्य ग्रामीण नागरिक हवालदिल झाले आहे, तरी ग्रामीण भागातील बस सेवा पूर्वरत सुरू करावी, यासाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेसतर्फे डेपो मॅनेजर ला निवेदन देण्यात आले.

कोरोना महामारीमुळे बऱ्याच दिवसापासून बस सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना सरकारी कार्यालय, दवाखाना, कोर्टाची कामे, शेती साहित्यासाठी मुक्ताईनगर ला ये जा करावी लागत होती. बस सेवा बंद असल्याने सामान्य ग्रामीण नागरिक हवालदिल झाले आहे, तरी ग्रामीण भागातील बस सेवा पूर्वरत सुरू करावी यासाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस तर्फे डेपो मॅनेजर ला निवेदन देण्यात आले, बस सेवा लवकरात लवकर सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, एस ए भोई, मागास प्रवर्ग उपाध्यक्ष बी डी गवई, ऍड.अरविंद गोसावी, शरद महाजन, नामदेव काका भोई, अनिल वाडीले, दिनेश पाटील, प्रा सुभाष पाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष प्रा. पवन खुरपडे, ऍड.राहुल पाटील, राजू जाधव, नीरज बोरखेडे (विधानसभा अध्यक्ष), निखिल चौधरी, शिवाजी पाटील, प्रकाश रोठे, गजानन पवार, ऍड. कुणाल गवई, राहील आसिफ खान, महेश खुळे, शेख भैय्या आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content