भुसावळ : प्रतिनिधी । येथील स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे “BSARA Ladies Equality Run 2021” (season-2) व BSARA Paal Ultra Hill Cycling Challenge “ चे ७ मार्चरोजी आयोजन” करण्यात आले आहे
मागील वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी देखील आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ७ मार्च रोज़ी हे आयोजन करण्यात येणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी मर्यादित महिलांना प्रवेश देण्यात येईल उर्वरित सहभागी महिलांना व्हर्चुअल पध्दतीने सहभाग नोंदविता येईल. या वर्षी खबरदारीचा उपाय म्हणून नावनोंदणी आँनलाईन पध्दतीने २६ जानेवारीपासून सुरू होईल व नावनोंदणी फी ३०० रूपये असेल.
यशस्वी सहभागी स्पर्धकास टि शर्ट, पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. ३ किमी, ५ किमी व १० किमी अशा तीन गटांत ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल अशी माहिती डॉ. निलिमा नेहेते व डॉ. चारूलता पाटील यांनी दिली .
या वर्षीपासून BSARA Paal Ultra Hill Cycling Challenge चे देखील आयोजन करण्यात येणार असून शहरातील नागरीकांना सायकलिंगचा अधिकाधिक सराव व्हावा हा यामागे हेतू असून ही स्पर्धा १४ फेब्रुवारी रोजी ५० किमी व १०० किमी या दोन गटात होणार असून ५० किमी साठी भुसावल ते खिरोदा व परत भुसावल तर १०० किमी साठी भुसावल ते पाल व परत भुसावल असा आव्हानात्मक मार्ग असेल अशी माहिती प्रवीण फालक यांनी दिली. नावनोंदणी फी ३०० रूपये असेल. यशस्वी सहभागी स्पर्धकास पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
ही माहिती देण्यासाठी आयोकीत पत्रपरिषदेत भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनचे प्रविण फालक, डॉ. तुषार पाटील, लेडिज रनच्या समन्वयिका डॉ. निलिमा नेहेते व डॉ. चारूलता पाटील, गणसिंग पाटील, प्रविण वारके, रणजित खरारे, प्रविण पाटील उपस्थित होते.