बनावट सौदा पावती करून मिळकत हडपण्याचा प्रयत्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामदास कॉलनी तसेच मेहरुण येथील मिळकत बनावट सौदा पावती करून हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहरातील दोन वकिलांसह ११ जणांविरुद्ध रविवार, ४ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हापेठ पोलिसात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेली माहिती अशी की, मनोज वाणी यांच्या राजेश घनशाम पाटील (रा. गोकुळ बंगला, शिवरामनगर, चर्चचे समोर, जळगांव) यांना परिवारासह ओळखत होते. दिनांक 2 नोव्हेबर 2022 रोजी दोन वर्तमानपत्रामधील जाहीर नोटीसीव्दारे मला समजले की, माझे मालकीचे रहाते घर व मी माझे व्यवसायासाठी रामदास कॉलनी 18/2, जळगाव येथील भाडेतत्वावर घेतलेली इमारतीमधील तळमजलेवरील मिळकती बनावट सौदेपावत्या या राजेश घनशाम पाटील यांनी त्यांचे सहकारी , जितेंद्र बाबुराव देशमुख (रा. पाटीलवाडा, आसोदा ह. मु. अयोध्या प्रोव्हीजन जवळ, अयोध्या नगर, जळगाव), , मिलींद नारायण सोनवणे (रा. 7 नुतनवर्षा कॉलनी, महाबळ जळगाव), , जगदीशचंद्र पुंडलिक पाटील (रा. गुरु माउली श्रीराम समर्थ कॉलनी, गट नं. 327 प्लॉट नं.5 खोटेनगर स्टॉपजवळ), 5] सुजाता राजेश पाटील (रा. गोकुळ बंगला, शिवरामनगर, चर्चचे समोर, जळगाव), विनिता संजय पाटील (रा. वेद गिरणार महाविद्यापीठ 21 के. एम. कनकपुरा रोड, आर्ट ऑफ लिव्हि ंग आश्रम, उदयपुरा बंगलौर), लिना रणजित बंड (रा. बंड ऍन्ड स्पॉ मारोती शोर म, अमरावती), अनिता नितीन चिंचोले (रा. प्लॉट नं. 132, आर्दशनगर, जळगाव), ऍड. सतिश बी. चव्हाण (रा.रामबाग कॉलनी, आयएमआर कॉलेजसमोर, जळगाव), ऍड. सुरेखा डी. पाटील (रा. जळगाव ऑफीस उत्कर्ष प्लॉझा ख्वाजामिया चौक, प्रोग्रेसिव्ह स्कुलसमोर, जळगाव) यांनी आपआपसांत संगनमत करून कटकारस्थान करत मयत कै. घनशाम लक्ष्मण पाटील व हिराबाई लक्ष्मण पाटील यांच्या सोबत त्यांचा दिनांक 3 जानेवारी 2017 रोजी लेखी सौदा पावती करारनामा झाला आहे व सदरचा करारनामा हा रक्कम 45 लाख रुपयाचा झालेला असून त्यापोटी त्यांनी लिहून देणार यांना रक्कम 45 लाख रोख वेळोवेळी रोख अदा केले आहे, अशी सौदा पावतीत नमुद केले आहे.

मुळात सदरहू हिराबाई घनशाम पाटील यांच्या नावावर गट नं. 44 पिंप्राळा शिवार सि.स.7821 व सर्व्हे नं. 494, प्लॉट नं.18 मेहरूण शिवार नव्हत्या व नाही. त्यामुळे सदरच्या मिळकती संदर्भात सदरचा सौदा पावतीचा करारनामा वरील कै.घनशाम पाटील यांची मुळ सही व सौदे पावतीवरील सही यामध्ये देखील तफावत आहे, त्यामुळे सर्व संशयित आरोपींनी संगनमत करून कटकारस्थान करत रितसर नोंदणीकृत खरेदीखतान्वये विकत घेतलेली मिळकत हडप करता यावी, यासाठी मागील तारखेचा स्टॅम्प विकत घेत त्यावर मयत कै. घनशाम लक्ष्मण पाटील यांच्या खोट्या सहया करून खोटी रक्कम दिल्याचे नमुद करत दोन्ही सौदा पावत्या खोटया व बनावट करत माझी फसवणुक केली असल्याचेही मनोज वाणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन रविवारी राजेश घनशाम पाटील, जितेंद्र बाबुराव देशमुख (रा. पाटीलवाडा, आसोदा ह. मु. अयोध्या प्रोव्हीजन जवळ, अयोध्या नगर, जळगाव), , मिलींद नारायण सोनवणे (रा. 7 नुतनवर्षा कॉलनी, महाबळ जळगाव), , जगदीशचंद्र पुंडलिक पाटील (रा. गुरु माउली श्रीराम समर्थ कॉलनी, गट नं. 327 प्लॉट नं.5 खोटेनगर स्टॉपजवळ), 5] सुजाता राजेश पाटील (रा. गोकुळ बंगला, शिवरामनगर, चर्चचे समोर, जळगाव), विनिता संजय पाटील (रा. वेद गिरणार महाविद्यापीठ 21 के. एम. कनकपुरा रोड, आर्ट ऑफ लिव्हि ंग आश्रम, उदयपुरा बंगलौर), लिना रणजित बंड (रा. बंड ऍन्ड स्पॉ मारोती शोर म, अमरावती), अनिता नितीन चिंचोले (रा. प्लॉट नं. 132, आर्दशनगर, जळगाव), ऍड. सतिश बी. चव्हाण (रा.रामबाग कॉलनी, आयएमआर कॉलेजसमोर, जळगाव), ऍड. सुरेखा डी. पाटील (रा. जळगाव ऑफीस उत्कर्ष प्लॉझा ख्वाजामिया चौक, प्रोग्रेसिव्ह स्कुलसमोर, जळगाव) या दहा जणांविराधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर पवार हे करीत आहेत.

Protected Content